रावेर तालुक्यातील पाल येथील रेशन दुकान नंबर २३ च्या लाभार्थीना गेल्या दोन तीन वर्षांपासून वेळेवर स्वस्त तसेच शासकीय योजनेतील मोफत धान्य मिळत नसल्याने पाल येथील संतप्त नागरिकांनी दुकानाला कुलूप ठोकले. यात महिलांचाही समावेश होता.[ads id="ads1"]
पाल येथे दोन रेशन दुकाने असून २३ नंबरचे दुकान अय्यूब तडवी यांचे आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून शिधापत्रिकेवर मिळणारे स्वस्त धान्य वाटप त्यांनी केलेच नाही. तसेच गेल्या दोन, तीन वर्षांपासून वाटप अनियमित असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. नागरिक कामधंदा सोडून रोज दोन तीन तास रेशन दुकानासमोर बसून असतात मात्र वाटप सुरू होत नाही. [ads id="ads2"]
पॉस मशीनमध्ये डाटा येत नसल्याचे कारण दुकानदार सांगत असतो. काही वेळ येऊन दुकान बंद करून दुकानदार निघून जातो. काही महिन्यांपासून हे नाट्य सुरू असल्याने मंगळवारी दुकानासमोर बसलेले ग्राहक संतप्त झाले. दुकानदारास विचारणा केली असता, तुम्हाला करायचे ते करा, अशी उत्तरे तो देत होता. अखेर संतप्त ग्रामस्थांनी दुकानाला कुलूप ठोकून आपली नाराजी व्यक्त केली.
पाल येथील दुकान नंबर २३ ची वारंवार तक्रार येत आहे. याप्रश्नी जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सांगून रेशन दुकानदाराचा परवाना निलंबित करण्याच्या सूचना केल्या जातील.
शिरीष चौधरी, आमदार



