मौजे शिंगाडी ता रावेर जिल्हा जळगाव येथील जमिनीचे मुल्यांकन अहवाल देणास दिरंगाई करुण पुर्नवसन करणे कामी वेळ काढु पणा करत असल्याने पुनर्वसन ग्रस्त लाभार्थी यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे बाबत प्रांत अधिकारी याना निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, मौजे शिंगाडी येथील पुनर्वसन भु. स. क. ६८/२००७ असून सदर जमिनिचे मुल्यांकन करणेसाठी फैजपुर प्रात यांना तीन वेळा स्मरण पत्र दिलेली आहे. परंतु त्यानी जमिनीचे मुल्यांकन केलेले नसल्यामुळे अवार्ड करणे अडचणीचे झालेले आहे. सदर पुनर्वसन ग्रस्तांनी अनेक वेळा या विषया बाबत विभागातिल अधिकाऱ्याच्या भेटीघेऊन विनंती केल्या पंरतु त्यानी नेहमी दुर्लक्ष केलेले आहे.[ads id="ads2"]
सदर २२२ / १ ग. न. क्षेत्र हे पुनर्वसनासाठी समाविस्ट असतांनासुद्धा या क्षेत्रात अनधिकृतपणे प्लाट पाडुन सदर शेतकरी हे शासनची व पुनर्वसन ग्रस्ताची दिशाभुल करीत आहेत. यामुळे पुनर्वसन ग्रस्तांवर अन्याय होत असून सदर विभागने शेतीवर अनिधीकृत केलेली नोंदी रद करून मुल्यांकन अहवाल त्वरीत दयावा अन्यथा लोकशाही मार्गाने सर्व पुनर्वसन ग्रस्त दिनांक ३० मे २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सरपंच राजु सवर्णे, उमेश गाढे व पुनर्वसन ग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



