चिनावल येथील ग्रामसभेत अजेंड्यावर असलेल्या विषयांचे वाचन येथील ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांनी केले अजेंड्यावर असलेल्या विषयावर चर्चा होवून मंजूर करण्यात आले तर विजयकुमार जैस्वाल यांच्या देशी दारू दुकान स्थलांतर बाबत आलेल्या अर्जाबाबत चर्चे वर सदर अर्जदारांच सभेला हजर नसल्याने हा विषय नामंजूर करण्यात आला तर काही जणांनी गावात संपूर्ण दारु बंदी करण्याची मागणी केल्याने हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यावा असे आवाजी बहुमताने ठरले तर येथील ग्रामस्थांनी विविध समस्या सभेत मांडले.[ads id="ads2"]
त्यावर सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाने सविस्तर उत्तर देवून ग्रामसथाचे समाधान केले या वेळी येथील लोकनियुक्त सरपंच सौ भावना योगेश बोरोले यांनी सभेत मार्गदर्शन करताना सर्वांनी पाणी जपून वापरा , स्वच्छता व आरोग्य चांगले राहण्यासाठी महिला पुरुषांनी आपला परिसर ,गटारी स्वच्छ ठेवा नळा ला तोट्या लावा व ग्रामपचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले सदर वेळी जि प सदस्य सौ सुरेखा पाटील , उपसरपंच परेश महाजन ,सागर भारंबे , संदिप टोके , शशीकांत भालेराव , कविता किरगे ,धनश्री नेमाडे मनिषा पाटील , ज्योती भालेराव , हे सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले , श्रीकांत सरोदे , बन्सी गारसे ,किरण नेमाडे , डॉ सुभाष ठाकूर , रोहिदास बाऱ्ये अनिल किरगे यांनी सभेत भाग घेतला या वेळी ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांनी सभेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले
गावात संपूर्ण दारु बंदी चां ठराव करण्याची मागणी सदर सभेत झाल्याने या बाबत शासन स्तरावर पाठपुरावा करु अशी प्रतिक्रिया ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले


