रावेर(प्रतिनिधी) रावेर तालुक्यात मस्कावद बु येथे हल्ली कार्यरत असणारे आणि हृदय शस्त्रक्रियेचा बनाव करून सन २०१७ पासून वाघोदा खु येथून तालुका अंतर्गत बदलीतून सूट मिळवून प स रावेर प्रशासनाची दिशाभूल करणारे ग्रामसेवक श्री शिवाजी सोनवणे यांची जिल्हा परिषदेने रावेर तालुक्यातून यावल तालुक्यात बदली केली आहे. सोनवणे यांना दि ३१/०५/२०२२ रोजी प स रावेर येथील गट विकास अधिकारी श्रीमती दीपाली कोतवाल यांनी कार्यमुक्त केले आहे.[ads id="ads2"]
श्री.शिवाजी सोनवणे यांनी ह्रदय शस्त्रक्रियेचा बनाव करून तालुका अंतर्गत बदलीतून सूट मिळविल्याचे चौकशीत उघड झाले होते, तसा गट विकास अधिकारी यांनी त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाईसाठी जिल्हा परिषदेकडे अहवालही पाठविलेला आहे ; तक्रारदार श्री किशोर भिवा तायडे अजूनही सोनवणे यांचेवर प्रशासकीय कारवाई व्हावी यासाठी आग्रही आहेत. त्यांचे सोनवणे यांच्या बदलीने समाधान झालेले नाही.येत्या पंधरा दिवसात जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, अशी तायडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तायडे यांनी जानेवारी महिन्यात पंचायत समिती रावेर कार्यालयासमोर उपोषणही केले होते.


