ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सौजन्य (सुविधा ऑनलाईन रावेर) : जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभाग होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागचे सहाय्यक आयुक्त व्ही.जे मुकाने यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.[ads id="ads2"]  

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील उमेदवारांची नांव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागांच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन नांव नोंदणी करीत आहे. याच अनुषंगाने अल्पसंख्यांक उमेदवाराना देखील रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ मिळणे करीता जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नांव नोंदणी करणे अपेक्षीत आहे.[ads id="ads1"]  

   कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नांव नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन व सहाय्य या कार्यालयाकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी घेण्यांत येणाऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यांत यावा, अल्पसंख्याक उमेदवारानी देखील आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचा लाभ घेण्यांचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी कळविले आहे.


याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!