भुसावळ शहरातील सहकार नगरातील तनिष्क अपार्टमेंट मधील रहिवासी अर्पणा सोपान पाटील (वय १६, मूळ रा.साकेगाव) या दहावीतील विद्यार्थिनीने आई रागावल्याने धान्याला कीडीपासून वाचवणारे औषध सेवन करून आत्महत्या केली.[ads id="ads2"]
तनिष्क अपार्टमेंटमधील अर्पणा पाटील ही गुरुकुल शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेतेय. मंगळवारी काही कारणावरून अर्पणाची आई तिला रागावली. यामुळे अर्पणाने टोकाचे पाऊल उचलले. धान्याला कीड लागू नये म्हणून टाकले जाणाऱ्या औषधाची पावडर पाण्यात मिसळून पिऊन घेतली. [ads id="ads1"]
हा प्रकार उघडकीस येताच मंगळवारी दुपारी ४ वाजता तिला शहरातील मानवतकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी अर्पणाचा रक्तदाब व शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली हाेती. यामुळे तिला ऑक्सिजन लावण्यात आला. जि.प.चे माजी सदस्य रवींद्र पाटील यांनी देखील हॉस्पिटल गाठून चाैकशी केली. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे १.४५ वाजता अर्पणाचा मृत्यू झाला. शहर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.


