प्रतापसिंग बोदडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर असंख्य गीते लिहिलेली आहेत. काल झालेल्या श्रद्धांजली सभेत वेगवेगळ्या सामाजिक संस्था, जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील प्रतिष्ठित नागरिक यांनी प्रतापसिंग बोदडे यांच्या राहत्या घरी श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व ने सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. [ads id="ads2"]
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा जळगाव शाखा पूर्वचे कुटुंबप्रमुख आणि नाशिक विभागाचे विभागीय सचिव के.वाय. सुरवाडे, जळगाव जिल्हा शाखा चे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव, मुक्ताईनगर तालुक्याची संपूर्ण कार्यकारणी, जळगाव जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारणी त्यामध्ये सुमंगल अहिरे, ए.टी. सुरडकर, संजीव साळवे, सुभाष सपकाळे, मुकेश जाधव आणि आनंद ढिवरे उपस्थित होते.