ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी परीक्षेचा निकाल ९८.१७ टक्के
ऐनपुर प्रतिनिधी( विजय एस अवसरमल)
मार्च २०२२ मध्ये झालेल्या इयत्ता १२ वी च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल दिनांक ८ रोजी आँनलाईन पध्दतीने जाहीर झाला असून यात ऐनपुर तापी शिक्षण प्रसारक मंडळाने चालवलेले सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल हा ९८.१७ टक्के लागलेला आहे.[ads id="ads2"]
यात दिया राहूल चौधरी हिने ८६.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर विभुषा अमोल पाटील हिने ८३.५० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे तर महेल कैलास पाटील हिने ८२.८३ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे सदर १२ वी त एकुण १८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी १८३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत शाळेचा निकाल ९८.१७ टक्के लागला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक आर जे पाटील सर उपमुख्याध्यापक सुबोध चौधरी सर पर्यवेक्षक पी आर पाटील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.