वीज तारांच्या धक्क्याने रावेर तालुक्यातील खिरोदा येथील बालकाचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


वादळी वार्‍यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने खिरोदा येथे एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. रावेर तालुक्यातील बर्‍याच परीसराला गुरुवारी सायंकाळी वादळी वार्‍याने जोरदार तडाखा दिला. यामुळे खिरोदा तसेच परिसरातील गावांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी पत्रे उडाली. तसेच तारा देखील खाली पडल्या. यामुळे या भागातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.[ads id="ads1"] 

पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

दरम्यान, गुरुवारी सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणार्‍या अफसर अजित तडवी याच पाच वर्षाच्या बालकाचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. काल वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने या चिमुकल्याला प्राण गमवावा लागल्याने परीसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान. या प्रकरणी सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर, महावितरणने तातडीने खाली पडलेल्या तसेच लोंबकणार्‍या तारांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.[ads id="ads2"] 

घटनास्थळी पाहणी करताना कर्तव्यदक्ष अधिकारी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, खिरोदा सर्कल भंगाळे ,तलाठी सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी गायकवाड  सह आमदार शिरीष दादा चौधरी यांचें सहाय्यक भानुदास मेढे, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, उपसरपंच सावखेडा अल्लादिन तडवी, महेंद्र पाटील गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य,सह अनेकांनी सदर कुटुंबाला सहानुभूती देवून लवकरात लवकर शासनाकडून सर्वपरी मदत मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील असे आश्वासन मा.रावेर तहसीलदार यांनी दिले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!