समाजसेवक तथा भावी लोकप्रतिनिधी डॉ.कुंदन फेगडे, उद्योग पती श्रीराम पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 200 वर्षांपूर्वीचा मोठा वटवृक्ष घरावर कोसळुन घराचे व ट्रॅक्टर चे नुकसान

रावेर ( सुरेश पाटील) गुरुवार दि.9 रोजी रावेर विधानसभा मतदार संघात रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांना नुकसानीचा मोठा फटका बसला,या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना रावेर मतदार संघातील यावल येथील समाजसेवक तथा भावी लोकप्रतिनिधी डॉ.कुंदन फेगडे व रावेर येथील समाजसेवक, उद्योगपती तथा श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.[ads id="ads1"] 

       सावखेडा ता.रावेर येथे ग्रामपंचायत जवळ प्रल्हाद बाबुराव पाटील व समाधान पाटील यांच्या घरावर सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष पूर्वाचा जुना मोठा वटवृक्ष कोसळून घराचे नुकसान झाले.तसेच शेती मशागती साठी लागणारे ट्रॅक्टर सुद्धा या वृक्षा खाली दाबले जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले.अशा नैसर्गिक आपत्ती व संकटाच्या काळात त्यांना दिलासा दिला व लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती संबंधित तहसीलदार,ग्रामसेवक,सरपंच यांना करण्यात आली.[ads id="ads2"] 

  नुकसान ग्रस्तांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सामर्थ्य दिले या प्रसंगी डॉ.कुंदनदादा फेगडे, श्रीराम फॉउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम दादा पाटील,उमेश इंगळे, पंकज इंगळे,मनोज धनगर, यशपाल धांडे,संजू कोळंबे, प्रल्हाद पाटील,समाधान पाटील, मधू पाटील,तुषार बढे,यशवंत महाजन,लोकेश महाजन,रोहन सरोदे,कृषी सहाय्यक एस.एम.जाधव,तलाठी निलेश चौधरी,परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी,भाजपा पदाधिकारी कृषी अधिकारी, ग्रामसेवक इत्यादी नागरिक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.वादळी पावसात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना पुढील कार्यासाठी धीर देत शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!