डॉ.कुंदन फेगडे यांच्याकडून सातोद विकासो निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) शुक्रवार दि.10जुन2022रोजी यावल तालुक्यातील सातोद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची दि.24एप्रिल रोजी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत हर्षलभाऊ पाटील यांच्या नेतुत्वाखाली बिनविरोध विजय झाल्यामुळे सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे युवा सामाजिक कार्यकर्ते व विकासो चे सभासद डॉ.कुंदनदादा फेगडे यांनी पुष्यगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.[ads id="ads1"] 

       विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सतीश पाटील तर व्हाईस चेअरमनपदी केशव तळेले यांची बिनविरोध निवड होऊन सलग 3वेळा या पॅनलचे वर्चस्व त्यांनी कायम ठेवले.[ads id="ads2"] 

  या प्रसंगी सुधाकर फेगडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, डॉ.कुंदन फेगडे,विकासो चेअरमन सतीश पाटील,व्हाईस चेअरमन केशव तळेले,सदस्य अशोक पाटील,सतीश फेगडे,रुपचंद तळेले रवींद्र महाजन,केदार धांडे, त्र्यंबक तळेले,सौ.लीलाबाई तळेले,सौ.युगंधराबाई पाटील, सचिव अंबादास मराठे,खत विभाग कर्मचारी लीलाधर धांडे,धान्य विभाग कर्मचारी भरत फेगडे आदींची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!