ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्नेह विचार सभा संपन्न झाली.
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान सेल चे जिल्हा अध्यक्ष सोपान बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्नेह विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
या कार्यक्रमात पक्षाचे कार्यपद्धती व भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत पक्षाने दिलेले उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून आणता येतील यावर पक्षाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे ऐनपुर निंभोरा जि.प.गटात व गणात बुथ कमिटी नेमणूक करणे बाबत चर्चा करण्यात आली.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किसान सेल चे जिल्हा अध्यक्ष सोपान बाबुराव पाटील युवा जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील रावेर तालुका अध्यक्ष निलकंठ चौधरी महीला तालुका अध्यक्ष रेखाताई चौधरी महीला जिल्हा सरचिटणीस मायाताई बारी पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे शशांक पाटील सुनिल कोंडे सचिन महाले वाय डी पाटील डिगंबर चौधरी शिवाजी पाटील दिलशाद खान प्रल्हाद बोंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ऐनपुर येथील सरपंच अमोल महाजन, किशोर पाटील तालुका सरचिटणीस अरविंद महाजन अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष हैदर अली सैय्यद तालुका उपाध्यक्ष सलमान खान शेख शाहरुख अनिल आसेकर चिंतन आसेकर व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.


