तर तापी - पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रल्हाद महाजन ( बलवाडी ) यांची राज्य पातळीवर निवड झाली असून मोठे वाघोदा येथील दैनिक दिव्य मराठीचे वार्ताहर व वृत्तपत्र एजंट यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. [ads id="ads2"]
तापी - पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय निंबाळकर यांचे स्वागत राहूल सोनी यांनी केले. तर प्रमुख पाहूणे गोपाल चौधरी यांचे स्वागत बाळू पाटील यांनी केले. आपल्या संघटने मधून राज्य पातळीवर प्रल्हाद महाजनयांची निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत : - जिवन चौधरी यांनी केले. असून मोठे वाघोदा येथील एजंट कमलाकर माळी यांना समाज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांचे स्वागत संघटनेच्या वतीने महेश वाणी यांनी केले. तापी - पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटना ही एजंट - विक्रेते यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असणारी संघटना आहे. विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आवाज उठवत आहे. वृत्तपत्र व्यवस्थापनासह शासनाकडे सतत पाठपुरावा करीत प्रश्न मार्गी लावण्याचे काम करीत असून या पुढेही अनेक कामे करण्याची आहेत. त्यासाठी एकजूट असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन संजय निंबाळकर यांनी सांगीतले.
या कार्यक्रमात कमिशन वाढ, पुरवणी टाकणवाढ, वार्षीक युट्या, डिपॉझीट रक्कम वर व्याज मिळावे. अशा अनेक मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे संघटना अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सहा तालुक्यातून वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. विक्रेत्यांच्या अडी - अडचणींवर चर्चा करण्यात आली. व पेपर कंपन्यांना निवेदन देण्या संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी संजय निंबाळकर ( वरणगाव ) गोपाल चौधरी ( जळगाव ) राहूल सोनी ( जामनेर ) उज्वल मराठे ( तळवेल ) कमलाकर माळी ( वाघोदा ) गोकुळ कोळी ( मनवेल )प्रल्हाद महाजन ( बलवाडी ) गणेश पाटील ( उटखेडा ) नितिन बाणाईत ( सांगवी ) जिवन चौधरी ( दहिगाव ) सुभाष कुलकर्णी ( सावदा ) महेश वाणी ( यावल ) प्रभाकर मराठे ( वरणगाव ) विकास पाटील ( सावदा ) सुनिल सोनी ( जामनेर ) प्रमोद चौधरी ( सावखेडा ) आदी वृत्तपत्रे विक्रेते उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक उज्वल मराठे यांनी केली. तर आभार शांताराम लाठे यांनी मानले.


