किनगांवात एकाने केला तीन तरुणांवर चाकु हल्ला ; आरोपीस अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

पोलिसांचा धाक गेला खड्ड्यात

यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील किनगांवात एका तरूणाने एकाच दिवशी एका वेळेला तिन जणांवर चाकु हल्ला केला त्यात तिन जण गंभीर झाले. जखमीवर यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असुन,रात्री उशीरा पर्यंत त्या चाकुहल्ला करणाऱ्या विरूद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

      याबाबत मिळालेली माहीती अशी की,यावल तालुक्यातील किनगाव येथे येथे दि.15जुनच्या रात्री10ते10:30वाजेच्या दरम्यान फॉरेस्ट जवळ उभे असतांना गावात राहणाऱ्या शाह नामक तरूणाने तौसीफ समिर तडवी वय19,शरीफ लुकमान तडवी वय19आणी सद्दाम नवाज तडवी वय20यांच्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जख्मी केल्याची घटना घडली असुन तिघ जखमीना उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णातयात दाखल करण्यात आले.[ads id="ads2"] 

   जखमीवर वैद्यकीय अधिकारी डॉ.अमीत तडवी व त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रथम उपचार केले,यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव वैद्यकीय विद्यालयात पाठविण्यात आले.या संदर्भात यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे, पोलीस नाईक राजेन्द्र पवार यांनी या घटनेतील जखमींची माहीती घेतली असुन,त्या हल्ला करणाऱ्या तरूणा विरुद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला. दरम्यान हल्ला करणारा तरूण मात्र फरार असल्याचे वृत्त आहे. हल्ला करणाऱ्या तरूणाने या तिघ तरूणांवर कशा प्रकारे प्राणघातक हल्ला का केला याची मात्र माहीती अद्याप समोर आली नसल्याचे समजले मात्र गावात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.आणि यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलिसांचा धाक आणि नियंत्रण आहे किंवा नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!