विवरे प्रतिनिधी (समाधान गाढे)आज दि.15/06/2022 रोजी .रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे जि.प.मराठी शाळा विवरे येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्सवात झाली.सर्वप्रथम इ १ली त दाखल झालेले व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत कार्यालयापासून ढोल ताशे सह वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली.[ads id="ads1"]
यावेळी इ १ली तील विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्सवाचे व आनंदाचे वातावरण होते.प्रभातफेरी ची सांगता जि .प . शाळेत झाली.यावेळी श्री विवेक महाजन साहेब ,सहा.कार्यक्रम अधिकारी स.शि. जि .प .जळगाव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.यानंतर *विवरे खुर्द चे सरपंच सौ. स्वराताई पाटील यांच्या शुभहस्ते इ 1 ली . सेमी इंग्रजी वर्गाचे उदघाटन झाले* .यावेळी बोलताना सरपंच यांनी विवरे खु . गावातील जि. प .शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणे ही गावासाठी व शाळेसाठी अभिमानाची व ऐतिहासिक बाब आहे.[ads id="ads2"]
या वर्गाचा लाभ गोरगरीब व होतकरू विद्यार्थी यांना नक्कीच होईल असे सांगितले व सर्व शिक्षक,विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सर्व इ १ली सेमी इंग्रजी वर्गातील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. शाळापूर्व तयारी अभियान मेळावा क्र 2 चे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अमोल गायकवाड व शा व्य स सदस्य तथा ग्राम पंचायत सदस्य श्री सुनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी इ १ली तील विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.मेळाव्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ग्राम पंचायत उपसरपंच श्री बाबुराव पाटील,सदस्य श्री संदिप पाटील, ग्राम पंचायत सदस्य दिपक गाढे,मुख्याध्यापिका सौ प्रभावती नेहेते व मान्यवरांच्या शुभहस्ते मोफत पाठ्यपुस्तक चे वितरण करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांना शा.पो.आ. सोबत गोड पदार्थ व खाऊ वाटप करण्यात आला.पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री हर्षवर्धन तायडे यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक श्रीमती .मंगला डोळे, .श्री दिपक सोनार,सौ कुमुदिनी महाजन, श्रीमती मनीषा चौधरी यांनी परिश्रम घेतले.तसेच श्रीमती उषाबाई पाटील व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच मोठया संख्येने नागरिकांची उपस्थीती होती.



.jpg)