यावल तहसील कार्यालयातील लाचखोर कोषागार अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल (सुरेश पाटील) यावल येथील तहसील कार्यालयातील साडेबारा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच स्वीकारताना कोषागार अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात रंगेहात पकडले.

लाच स्वीकारताना पकडण्याची ही त्यांची ही दुसरी टर्म आहे.यावल तहसील कार्यालयावर जिल्हाधिकारी जळगाव यांचे नियंत्रण राहिले नसल्याची जोरदार चर्चा यावल तालुक्यात सुरु आहे.[ads id="ads1"] 

    यावल तहसीलदार कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नसल्याने सर्रासपणे टेबलवर पैसे घेतले जात असल्याची सुद्धा जोरदार चर्चा यावल तालुक्यात आहे नाशिक जवळील सप्तशृंगी देवीच्या परिसरात लाखो रुपये खर्चून एका महसूल अधिकार्‍याकडून भव्य दिव्य बांधकाम सुरु असल्याचे सुद्धा जळगाव जिल्ह्यात महसूल कार्यक्षेत्रात व राजकारणात बोलले जात आहे.[ads id="ads2"] 

  बदली करून आणणार्‍या लोकप्रतिनिधीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने मतदार संघात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यात एक प्रमुख अधिकारी सुद्धा सर्रासपणे आपल्या केबिनमध्ये पैसे घेत असल्याचे बोलले जात असले तरी त्याचा विपरीत परिणाम म्हणून एक नायब तहसीलदार आज पैसे घेताना पकडला गेला,त्यासह तालुक्यातील महसूल संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी विभागीय स्तरावरून झाल्यास अनेक प्रकरणे उजेडात येतील यासाठी कार्यवाही व्हायला पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.लाचलुचपत विभागामार्फत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!