आधार नसलेल्या वृद्धांच्या हाताला आधार कुणी द्यावा - डॉ.कुंदन फेगडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


डॉ कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास सांगवी बु. येथे उत्तम प्रतिसाद   

यावल (सुरेश पाटील) मंगळवार दिनांक १४ जुन २०२२ रोजी ग्रामपंचायत जवळ सांगवी बु तालुका यावल येथे डॉ. कुंदनदादा फेगडे* मित्र परिवारातर्फे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपरेशन साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार केले.[ads id="ads1"] 

      डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची,राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १०५ नेत्र रुग्णांची तपासणी व ११ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिये साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले.सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले.व नेत्र चिकित्सक डॉ.संजू शुक्ला यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली.[ads id="ads2"] 

  या वेळी डॉ.कुंदन फेगडे व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन सल्ला दिला या वेळी आधार नसलेल्या वृद्धांच्या हाताला आधार कुणी द्यावा असा प्रश्न डॉ.कुंदन फेगडे यांनी रुग्ण बांधवांना मार्गदर्शन करत असताना प्रश्न चिन्ह निर्माण केला.व आता पर्यंत २४ शिबीर हे आमच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने यावल तालुक्यात घेण्यात आले.यावेळी डॉ.फेगडे म्हणाले कि माझ्या व माझ्या मित्रपरिवार च्या सहकार्यातून वृद्ध सेवा होत आहे हे मी माझे भाग्य समजतो व यानंतर हि संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने मी व माझा संपूर्ण मित्र परिवार कार्य, सेवा करत राहतील अशी इच्छा व्यक्त केली.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती योगेशदादा भंगाळे होते,तर कार्यक्रमाचे उद्धघाटन सरपंच रसीद तडवी यांच्या हस्ते भारत मातेच्या व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले या प्रसंगी योगेश भंगाळे,(पंचायत समिती उपसभापती यावल)डॉ. कुंदन फेगडे,रशीद तडवी (सरपंच),दिनेश पाटील,अभय नेमाडे,प्रकाश सोनवणे,सौ. प्रतिभाताई पाटील,विक्रम मेघे, प्रकाश सोनवणे,प्रशांत चौधरी, बाळू चौधरी,शरद तायडे,राजू तडवी,कुंदन कोळी,नितीन कोळी, दिपक कोळी,प्रशांत बेंडाळे, मनिष धांडे,जयंत बोरोले, जितू कोळी,उदय पाटील,भूषण सूर्यवंशी,आदींची उपस्थिती होती, याशिबिरा साठी सागर लोहार, मनोज बारी,विशाल बारी,रितेश बारी,कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!