चेअरमनपदी उमेश महाजन, व्हा.चेअरमनपदी सौ.मिनाबाई पारधी
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील
धरणगांव - धरणगाव विविध सहकारी सोसायटी बिनविरोध निवडणूक पार पडली. चेअरमन म्हणून एकेकाळी याच सोसायटी चे शिपाई असलेले त्याच काळात धरणगाव धरणगाव विविध सहकारी सोसायटी बिनविरोध निवड चे उपाध्यक्ष असलेले उमेश जानकीराम महाजन आज चेअरमन पदी बिनविरोध निवडून आले तसेच व्हाईस चेअरमन म्हणून सौ. मिनाबाई रमण पारधी हे बिनविरोध निवडणून आले,त्यांना सर्व संचालकांनी सहकार्य केले, त्या बद्दल सर्व संचालकांचे आभार व्यक्त करण्यात आले.[ads id="ads2"]
या वेळी सर्व संचालक व शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पॅनल चे नेतृत्व करणारे सुरेश नाना चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माळी समाज अध्यक्ष विठोबा भाऊ माळी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, सुखदेव महाजन, दशरथ महाजन, रावा मांगो माळी, वासुदेव महाजन, सुभाष माळी, रविंद्र वाघ, विनोद शुक्ल, यासह सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.[ads id="ads1"]
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तडवी साहेब यांनी काम चोख पाहिले म्हणून गुलाबराव वाघ यांनी त्यांच्या सत्कार केला. सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


