रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक, उदळी खुर्द, गाते आदी गावात वर्षानुवर्षे अतिक्रमणात राहणार्या नागरीकांचे अतिक्रमण कायम करून लाभार्थींना राहत्या घरीच घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी सोमवार, 13 जून रोजी रावेर गटविकास अधिकार्यासह तहसीलदारांकडे करण्यात आली होती शिवाय मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्या आला. प्रशासनाकडून मागणीची दखल न घेण्यात आल्याने मंगळवारी रीपाइं पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली.[ads id="ads2"]
दरम्यान, आंदोलनानंतर प्रशासकीय गोटात खळबळ उडाल्यानंतर फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी गटविकास अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली तर गटविकास अधिकार्यांनी तातडीने विवरेचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आर.कोलते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतच्या प्रस्तावातील त्रृटी पूर्तता केली नसल्याने चार दिवसात ग्रामसेवक कोलते यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे.[ads id="ads1"]
यांनी नोंदविला आंदोलनात सहभाग
आंदोलनाचे नेतृत्व रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केले. तातलुकाध्यक्ष विकी तायडे, विनोद मोरे, भीमराव तायडे, कमलाकर गाढे, नरेंद्र तायडे, समाधान गाढे, किरण साबळे, रेखा गाढे, कार्तिका गाढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.


