रावेर तालुक्यातील थोरगव्हाण (Thorgavhan Taluka Raver) येथील तरूणाने आपल्याच शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात (Savada Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
याबाबत अधिक माहिती अशी की, पवन गणेश ठाकरे (कोळी) (वय-२३, थोरगव्हाण ता. रावेर ) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार १८ जून रोजी सकाळी पवन ठाकरे यांने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात (Savda Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.


