![]() |
| रुग्णाची तपासणी करताना आरोग्य सेविका मनिषा कोळी, राजेश्वर निकुंभ |
सिकलसेल हा आजार अनुवंशिक असून त्यावर उपचार व मार्गदर्शनाने हा आजार निश्चित बरा होतो असे आरोग्य विभागामार्फत उपस्थित असलेल्या आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ यांनी सांगितले.[ads id="ads1"]
सिकलसेल आजार अनुवंशिक असल्याने कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्तीमुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येकाने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी सिकलसेल तपासणी करावी, त्यामुळे पिढीत हा आजार टाळता येतो, वाहक-वाहक व्यक्ती तसेच वाहकब ग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करु नये, सर्व शासकीय आरोग्य संस्थेत मोफत सिकलसेल चाचणी करण्यात येत आहे, प्रत्येकांनी सिकलसेल चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ गफुर तडवी, साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँ स्वाती कवडीवाले यांचा मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका मनिषा कोळी, आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ , आशा स्वंयमसेविका सौ.रंजना कोळी, सौ.ज्योति मोरे, सौ.पुनम पाटील, अंगणवाडी सेविका प्रमिलाबाई कोळी मदतनीस आशा भिल्ल यांनी परीश्रम घेत आहेत


