याघटनेमुळे आंबेडकरी चळवळ पोरकी झाली असून आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठी की जी कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे.[ads id="ads2"]
प्रतापसिंगदादा सोडून जाणे ही अतिशय दुःखद घटना आंबेडकरी अनुयायांसाठी आहे. ज्यांच्या काव्याने केवळ महाराष्ट्र किंवा भारत देशातच नव्हे तर परदेशातही नावलौकिक मिळवले आहे. ते जरी आज आपल्यात नसले तरी हे काव्य रुपाने सदैव आपल्या हृदयात राहतील.
प्रतापसिंग बोदडे यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते.
विशेष लेख : प्रतापसिंग बोदडे : आंबेडकरी लोकगीतांचा आवाज हरपला
"भीमराज कि बेटी मै तो, जयभीमवाली हु ..! " तसेच दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर या गाण्याने संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा गाजले होते.
इतकेच नव्हे तर त्यांची गीतं मराठी हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा गाजलेली आहेत. त्यांचे पार्थिव आज मुक्ताईनगर येथील त्यांच्या नागभवन या त्यांच्या निवासस्थानी दुपारी आणण्यात आले असून त्यांच्या चाहत्या वर्गासाठी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व त्यांचा अंत्यविधी उद्या दि. ४ रोजी सकाळी १० वाजता मुक्ताईनगर येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा गायक कुणाल बोदडे, मुली, जावई, पत्नी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
💐 *भावपुर्ण पुष्पांजली* 💐
वामनाचा प्रताप सांगणारा प्रताप गेला ...
शाहिरीचा पहाडी बुलंद आवाज गेला ...
वामनाचा शिष्य ऐसा आता होणे नाही ...
क्रांतीची परिभाषा गीतांमधे गुंफणारा आता होणे नाही...
*दोनचं राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर* ...
*एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर* ...
*भीमराजकी बेटी मैं तो जयभीमवाली* हूं...
*तुझ्या पाऊलखुणा भिमराया ...*
ख्यातनाम गायक, महाकवी,लोकशाहीर स्मृतीशेष प्रतापसिंग बोदडे यांना भावपुर्ण आदरांजली ....


