रावेर( सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील केऱ्हाळे खु येथील महिला ग्रामसेविकेशी बेकायदेशीरपणे घरकुलाचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी हुज्जत घातल्याने ग्रामसेविका पौर्णिमा भालेराव यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.[ads id="ads2"]
काल दि २०/०६/२०२२ रोजी ग्रामसेविका आपल्या कर्तव्यावर असतांना सीताराम हरी तायडे आणि गीताबाई कैलास गोमटे यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येऊन ग्रामसेविका भालेराव यांचेशी दमदाटी करून बेकायदेशीरपणे अपात्र असतांना घरकुलाचा लाभ पदरात पाडण्यासाठी अरेरावी केली.
हेही वाचा :- मद्यपी मोटारसायकल चालवणार्या 6 जणांवर रावेर पोलिसांची कारवाई
अपशब्द वापरले म्हणून दुपारी रावेर पोलिसात भा द वि कलम १८६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.


%20-%202022-06-21T143824.596.jpeg)