ते वेटिंग वर होते.दरम्यान हजकमेटी कडील व्हीआयपी कोट्यामध्ये सदरील दांपत्याचा क्रमांक लागलेला असून साकळीच्या सै.शौकत सै.ताहेर व त्यांच्या पत्नी सर्फोन्नीसाबी सै.शौकत या जोडप्याला हजयात्रेसाठी जाण्याचे भाग्य लाभले आहे.ते मुंबईहून विमानाने हज जाणार आहे. सै.शौकत सै. ताहेर व सर्फोन्नीसाबी सै. शौकत हे साकळी ग्रामपंचायतीचे सदस्य सै.अशपाक सै.शौकत यांचे आई - वडील असून माजी ग्रामपंचायत सदस्य सै.तैय्यब सै. ताहेर यांचे भाऊ व वहिनी आहे.तर सै.अल्ताफभाई (भुसावळ) यांचे मामा- मामी आहेत.[ads id="ads1"]
सदर दाम्पत्याचा साकळी येथे हिंदू- मुस्लिम नागरिकांच्या वतीने एकत्रित सत्कार करण्यात आला व धार्मिक एकतेचे दर्शन घडवण्यात आले. सत्काराच्यावेळी वढोद्याचे सरपंच संदीप सोनवणे,भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुनिल पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य सै.तैय्यब सै. ताहेर , शे.अन्वरभाई (सुरत),ग्रा.पं.सदस्य जगदीश मराठे, सय्यद अशपाक सय्यद शौकत,वसीम खान,दीपक खेवलकर, शे. मोहसिन,अनिल जोशी,चेतन पाटील तसेच सै.शौकत सै.ताहेर यांचे कुटुंबीय हे उपस्थित होते.


