रावेर येथे छत्रपति राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी !

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दिनांक 26 जून 2022रोजी छत्रपति राजर्षी शाहू महाराज जयंती छत्रपती शिवाजी महाराज काम्प्लेक्स रावेर येथील माजी आमदार अरुणदादा पाटील यांचे कार्यालयात साजरी करण्यातआली या निमित्ताने समाजातील विविध संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते.[ads id="ads2"]  

राष्ट्रवादी किसान सेल जिल्हा अध्यक्ष मा. सोपनदादा पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण सुरवात करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी सेवदलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील हस्ते मेनबत्ती व धुपबत्ती प्रज्जवलित करुण मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले यावेळी जनक्रांति मोर्चा युवा जिल्हाध्यक्ष मा. साहेबराव वानखेड़े यांनी मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले की, शाहू महाराजाचे कार्य एका जाती धर्मा साठी नसून सर्व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी व हितासाठी कार्य केले, त्यांनी आपल्या राज्यात सक्तीचे व मोफत शिक्षण लागु केलेे.[ads id="ads1"]  

  महाराजांनी आपल्या राज्यात आरक्षणाची तरतुद केली, आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली एवढेच नाही तर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना देखील शिक्षणाकामी वेळोवेळी खुप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले व छत्रपती राजर्षि शाहू महाराजांची जयंती गावागावात शहरा शहरात साजरी झाली पाहिजे व त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे अशा आशयचे सखोल मार्गदर्शन केले ,व रावेर शहरात छत्रपती शाहू महाराज चौक झाला पाहिजे असा ठराव सर्वानु मते समंत करण्यात आला या नंतर सोपानदादा पाटील यानी त्यांच्या मनोगतात असे म्हटले की - प्रत्येकाच्या घरात शाहू महाराजांचे फोटो लावले गेले पाहिजे व त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे असे ते म्हणाले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपक तायडे सर यांनी केले व आभार adv.सतीश मोरे यांनी मानले आणि यावेळी बहुजन समाज पक्षाचे संघटनमंत्री ईश्वर जाधव, तालुका अध्यक्ष युवराज भालेराव, श्रीराम महाजन, adv समीर तडवी, सुपडु वाघ, दयाराम वानखेडे यांचेसह आदी समाज बांधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!