सावदा येथील कोचुर रोडवरील हॉटेल आराध्या समोर केळीच्या ट्रकला ट्रिपाल (ताळ पत्री) बांधत असताना शेजारून जाणाऱ्या आयशर ने जोरदार धडक दिल्याने केळी कामगार मजूराचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना शुक्रवार रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सावदा येथील कोचुर रोडवर हॉटेल आराध्या समोर घडली.[ads id="ads2"]
सविस्तर वृत्त असे की सावदा येथील कोचुर रोडवर ट्रक क्रं. एच आर ५५ ए जे ८९१२ मध्ये केळी माल भरुन झाल्यावर त्रिपाल टाकून ते दोरीने बांधत असतांना सावद्याकडून कोचुरकडे जाणाऱ्या आयशर क्रं. डी डी ०१ जी ९५५५ हिचेवरील चालकाने दुर्लक्ष करीत हयगीयीने भरधाव वेगात आला व समोर उभ्या असलेल्या ट्रक च्या उजवे बाजुने ट्रक ला दोरी बांधत असलेल्या सलीम तडवी यास जोरदार धडक देवून त्याचे डोक्यास गंभिर दुखापत झाल्याने वाघोदा बुद्रुक येथील केळी कामगार सलीम तडवी याचा घटनास्थळी मृत्यू झाला. आयशर क्रं. डी डी - ०१ जी ९५५५ वरील चालक विरुद्ध पोलीस ठाण्यात शरीफ तडवी याने तक्रार दाखल केली आहे.


