मुक्ताईनगर (संजीव तायडे) दिनांक ४ जून २०२२ सकाळी सकाळी 10 वाजता नागभवन या प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या राहत्या घरून अत्यंयात्रेस सुरवात झाली. यावेळी महाराष्ट्रातून हजारो अनुयायी हजर होते. अंत्ययात्रेसाठी धम्मरथ सजवण्यात आला होता. रथासमोर महार रेजिमेंटआणि समता सैनिक दलाच्या सैनिकांचे पथक चालत होते.[ads id="ads1"]
अंत्ययात्रा प्रवर्तन चौक आली असता येथे महार रेजिमेंटमध्ये व समता सैनिक दलाच्या जवानां तर्फे प्रतापसिंग दादा बोदडे यांना मानवंदना देण्यात आली. मुक्ताईनगर शहरातील खामखेडा रोडवरील स्मशानभूमीत दादांचे पुत्र कुणाल बोदडे यांचे हस्ते अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणिय होती. [ads id="ads2"]
महाराष्ट्र भरातून आलेल्या दादांचे अनुयायी,चाहते, कवी, गायक,राजकीय, सामाजिक सर्व समाज बांधव मुक्ताईनगरचे आमदार,पालकमंत्री, माजी मंत्री यांनी शोक संदेश पर भाषण करत दादांना आदरांजली वाहिली,सर्व जनसागराने आपल्या आवडत्या गायक,कवी, गीतकार, संगीतकार प्रतापसिंग दादा बोदडे यांना जड अंत:करणाने साश्रु नयनांनी अखेर चा निरोप दिला.


.jpg)