जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील वयोवृद्ध शेतमजुराने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 06/06/2022 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. [ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील वयोवृद्ध अरविंद माधव भंगाळे वय 62 वर्षे या वयोवृद्ध शेतमजूराने दारूच्या नशेत छताच्या अँगलला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत निंभोरा पोलीस स्टेशनला दुर्गेश अंबादास भंगाळे वय 42 वर्षे यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 13/2022 ने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. [ads id="ads2"]
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मयताचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नजमोद्दिन तडवी यांनी शवविच्छेदन केले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितीन पाटील हे करीत आहेत. मयताचे पश्चात पत्नी एक मुलगा सून असा परिवार आहे.