रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ज्ञान स्त्रोत केंद्र (ग्रंथालय) विभागातर्फे ०६ जून २०२२ रोजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी शिवस्वराज दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते. प्रथम महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यानंतर झूम द्वारे कार्यक्रमाला सुरुवात होवून कार्यक्रमाचे स्वरूप तसेच कार्यक्रमासाठी लाभलेल्या वक्त्यांचा परिचय महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. संदीप साळुंके यांनी करून दिला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. अक्षय महाजन हे होते. [ads id="ads1"]
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रा. अक्षय महाजन यांनी आपल्या व्याख्यानात, शिवरायांनी राज्याभिषेक का करवून घेतला याचे महत्त्व त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचे चे युद्धशास्त्र प्रशासनशास्त्र, राजकारण आणि राज्यकारभाराचे धोरण यावर त्यांनी प्रकाश टाकला. लढाया शांत डोक्याने लढायच्या असतात, उगाच हौतात्म्य आणि वीरमरण येण्यासाठी लढ्यायच्या नसतात, अनुकूल परिस्थिती असली की चाल करायचे असते आणि निकाल लावायचा असतो हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं असे त्यांनी मांडले. शिवाजी महाराजांचे धर्मांतरासंबंधीचे धोरण, वतनदारी पद्धत नष्ट करणे, स्वतःची मुद्रा धारण करणे, नाणी चलनात आणणे या व्यापक आणि क्रांतिकारी घटना होत्या. स्वराज्य ही कोणत्याही बादशाही सनदेच्या कृपेवर अवलंबून नव्हते ते शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वाने निर्माण केले होते असेही त्यांनी मांडले. समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना 1681 मध्ये पाठवलेल्या "अखंड सावध असावे" या पत्राचे विस्तृत विवरण त्यांनी करून देवून त्यांच्या व्याख्यानाची सांगता झाली.[ads id="ads2"]
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात, आपण शिवस्वराज म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन का साजरा करतो आहे याचे विस्तृत असे विवेचन करून आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व कर्तुत्वाचा वारसा आपण आपल्या कृतीतून चालवला पाहिजे असे आव्हान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप साळुंके यांनी केले सदर कार्यक्रमासाठी एकूण ८८ प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यायातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. संदीप साळुंके , प्रा. व्ही. एच. पाटील , मुख्य लिपिक श्री. गोपाल महाजन, कनिष्ट लिपिक श्री. प्रवीण महाजन, कनिष्ट लिपिक श्री. प्रा श्रीराम चौधरी, श्री. भास्कर पाटील, श्री. पुंडलिक पाटील, श्री. महेंद्र महाजन, श्री. हर्षल पाटील, यांनी परिश्रम घेतले.