ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
ऐनपुर येथे शिवराज्याभिषेक सोहळा चे औचित्य साधून शिवराज्याभिषेक गुढी उभारून कार्यक्रम संपन्न झाला.सविस्तर वृत्त असे की आज दिनांक ६/६/२०२२/ रोजी ऐनपुर ग्राम पंचायत मध्ये ३४८ वा . शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त गुढी उभारून संपन्न झाला सरपंच अमोल महाजन यांच्या हस्ते गुढीचे पुजन करण्यात आले.[ads id="ads2"]
शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे ग्रामसेवक गोसावी अप्पा यांनी पुजन केले तसेच किशोर पाटील यांनी श्रीफळ फोडले व सर्व ग्राम पंचायत सदस्य किशोर पाटील अनिल जैतकर राजेंद्र पाटील पवन पाटील विलास अवसरमल पृथ्वीराज जैतकर शे शेफी व सर्व कर्मचारी व नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.