धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव : जळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या दि अर्बन को ऑप बँक लि धरणगाव बँकेला बँको ब्ल्यू रिबन २०२१ हा पुरस्कार रिझर्व बँकेचे सेवानिवृत्त सी जी एम श्री काळे साहेब यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.[ads id="ads1"]
कोल्हापूर येथील अवीज पब्लिकेशन्स यांच्या तर्फे देशातील नागरी सहकारी बँकांच्या वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन दि. ०१ व ०२ जून २०२२ रोजी लोणावळा येथील रॅडीसन रिसोर्ट मध्ये करण्यात आले होते. सदर परिषदेस देशातील सहा राज्यातील नागरी सहकारी बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशभरातील साधारण ८०० बँकांनी या पुरस्कारासाठी नोंदणी केलेली होती त्यातून या बँकेस हा पुरस्कार ठेव रक्कम रु. १५० कोटी ते १७५ कोटी या वर्गवारीत मिळाला आहे. विशेष असे कि मागील वर्षी सुद्धा याच संस्थेला बँको ब्ल्यू रिबन २०२० हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.[ads id="ads2"]
यंदाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बँकेचे संचालक अॅड.श्री.राजेंद्र येवले , श्री प्रवीण कुडे , श्री संजय कोठारी व सी ई ओ श्री. सुशील गुजराथी उपस्थित होते. हा मनाचा पुरस्कार मिळाल्याने बँकेचे सन्माननीय चेअरमन श्री हेमलालशेठ भाटीया , व्हा चेअरमन श्री आधारनाना चौधरी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.