श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लि. यावल या सहकारी बँकेला बँको ब्लूरिबन २०२१पूरस्कार प्राप्त

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) अविज पब्लिकेशन कोल्हापूर व इन्मा गॅलॅक्सि पूणे व बँको यांच्या तर्फे लोणावळा येथील हॉटेल रेडीसन येथे चंद्रकांत बाळकृष्ण वाणी (सी. ई. ओ. श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लि. यावल )यांना बॅको ब्लू रिबन 2021 ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मध्ये प्रथम क्रमांकाच्या पूरस्काराने रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सी.जी एम काळे साहेब(मूंबई)बँकोचेअविनाश शिंत्रे गुंडाळे (कोल्हापूर)नाईक (पूणे) यांच्या हस्ते बँकेला सन्मानित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत बँकेच्या संचालक मंडळाने दिली.[ads id="ads1"] 

        मंगळवार दि.7 जून 2022 रोजी यावल येथील बँकिंग क्षेत्रात सुरक्षित आणि मजबूत असलेली श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लिमिटेड यावल संचालक मंडळ व बँक मॅनेजर यांच्यातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. [ads id="ads2"] 

       पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली की,लोणावळा येथील हॉटेल रेडिसन येथे 3 दिवसीय परिषदेत10राज्यातील एकूण550 बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.तसेच आपल्या श्री. व्यास धनवर्षा बँकेला स्थापने पासून "अ" वर्ग प्राप्त असून बँक दरवर्षी नफ्यात असते व बँकेचा एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेला यश मिळाले आहे.आणि थकीत कर्जाचे प्रमाण अत्यल्प असते.बँकेने दरवर्षी सभासदांना लाभांश दिला आहे.बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.अण्णासाहेब अट्रावलकर यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार बॅकेचे संचालकमंडळा द्वारे बॅकेचे कामकाज रिझर्व बँकेच्या अटी शर्तीनुसार चालविले जात आहे.सदरील पुरस्कार बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै. आण्णासाहेब अट्रावलकर यांच्या स्मृतीस व बँकचे सभासद,ग्राहक यांना समर्पित केला असल्याची माहिती सुद्धा उपस्थित बँकेचे चेअरमन शरद यावलकर व्हाईस चेअरमन दिलीप नेवे,संचालक हेमंत बळीराम चौधरी,अभिमन्यू बडगुजर,शांताताई कमलाकर वाणी,डॉ.सतीश यावलकर, किरण अट्रारावलकर यांनी दिली यावेळी बॅंक व्यवस्थापक चंद्रकांत वाणी यांनी उपस्थितांचे स्वागत करून बॅंकेच्या यशस्वी कामकाजाविषयी माहिती दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!