ऐनपूर प्रतिनिधी (विजय अवसरमल) ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील महिला क्रिकेट या खेळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात कु.तायडे अश्विनी किशोर एम. एस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची निवड झाली आहे. [ads id="ads1"]
सदर खेळाडूने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत चार विभागात उत्कृष्ट खेळ दाखविल्यामुळे विद्यापीठ संघात निवड झाली सदर आंतरविद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धा या पूर्णिमा विद्यापीठ जयपूर(राजस्थान) येथे २१ ते २५ जून २०२२ पर्यंत होणार आहे. कु. अश्विनी किशोर तायडे हिला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन एन झोपे व प्राचार्य डॉ.जे .बी .अंजने यांचे मार्गदर्शन लाभले.[ads id="ads2"]
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा महिला क्रिकेट संघ दिनांक 17 जून रोजी पौर्णिमा विद्यापीठ जयपूर येथे रवाना होणार आहे ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत भाऊ विश्वनाथ पाटील, चेअरमन श्रीराम नारायण पाटील, तसेच संस्थेचे सचिव संजय वामन पाटील, संचालक हरी भिका पाटील सर्व संचालक मंडळ स्थानिक क्रीडा समितीचे सदस्य डॉ.के जी कोल्हे ,डॉ.पी आर गवळी, प्रा. एस आर इंगळे डॉ.आर व्ही भोळे प्रा.डॉ.एस एस सांळुके तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


