रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर नगरपालिकेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी आज सोमवारी आरक्षण सोडत नगरपालिका सभागृहात जाहीर करण्यात आले आहे. या सोडतीत ओबीसी जागाचे आरक्षण वगळता इतर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.[ads id="ads2"]
रावेर नगरपालिकेच्या १२ प्रभागातून एकुण २४ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत प्रांताधिकारी महेश सुधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, यांचे सह सर्व पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.



