हरिविठ्ठलनगरातील गणपती मंदिरासमोरील भर रस्त्यावर शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रिक्षाचालक युवकाचा कोयता मारुन खून करण्यात आला आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली. पाेलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.[ads id="ads1"]
दिनेश काशिनाथ भोई (वय २८, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी रात्री ८.३० वाजता गणपती मंदिरासमोर एकाने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. भावाने व मित्रांनी त्याला रिक्षात टाकून जीएमसीत आणले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.[ads id="ads2"]
यामुळे हरिविठ्ठलनगरात तणाव निर्माण झाला होता. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दिनेश याचा हरिविठ्ठलनगरातील एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. जुन्या वादातून हा खून झाल्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी विठ्ठल हटकर नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.



