हिंदू वैदिक पद्धतीने विवाह केल्याची नोंद...
यावल (सुरेश पाटील)
यावल तालुक्यातील एक 25 वर्षीय तरुणी हरवल्याची नोंद असे वृत्त प्रसिद्ध झाल्याने या वृत्ताबाबत संशय व्यक्त केला जात असून त्या मुलीने यावल येथील तरुणाशी शुक्रवार दि. 8 जुलै 2022 रोजी जळगाव जिल्ह्यात एका अधिकृत विवाह नोंदणी मंडळात हिंदू वैदिक पद्धतीने विवाह संपन्न केला असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.[ads id="ads2"]
आणि या वृत्ताबाबत यावल शहरात विशेष करून त्या तरुण मुली बाबत आणि तरुण मुलाबाबत सकारात्मक रित्या चर्चा सुरू आहे.तरुण मुलगा आणि मुलगी हे सज्ञान असून त्यांनी त्यांचा विवाह स्वइच्छेनुसार आणि मर्जीनुसार विवाह केल्याने तरुणी हरवल्याचा प्रश्न उद्भवत नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात सकारात्मक रित्या बोलले जात आहे.


