ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदीरात वृक्षारोपण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

  ऐनपूर ता.रावेर येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालविलेल्या सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला.[ads id="ads2"]  

   ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा श्री.बा. ना.पाटील विद्यालयात बलवाडी शाळेचे मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील,शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन व मुख्याध्यापक शुभम महाजन यांनी शाळेच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारचे एकूण १५ रोपे लावली.त्यात फुलझाडे व चिंच,आवळा,पेरू,कडुलिंब, वड अशा वृक्षांची लागवड करण्यात आली.[ads id="ads1"]  

     सजीवसृष्टी बाबत झाडांचे महत्व लक्षात घेता झाडांचे संगोपन करण्याचे विद्यार्थांनी ठरविले. व विद्यार्थ्यांनी देखील वृक्षारोपण केले.तसेच शाळेतील शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीसुद्धा वृक्षरोपण कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!