Raver : तालुक्यातील रसलपुर येथे घरफोडी, 72 हजार रुपयांचा ऐवज लंपास; रावेर पोलिसात गुन्ह्याची नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७२ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रावेर तालुक्यातील रसलपूर येथे घडली आहे. वाढत्या चो-यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत रावेर पोलिसात (Raver Police Station) अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]  

या बाबत सविस्तर वृत्त असे की, "सोमवारी रात्री रावेर तालुक्यातील रसलपूर (Rasalpur Taluka Raver) येथील रहिवासी असलेल्या फरजाना बी शेख शाकिर यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाला असलेल्या कुलूपाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.[ads id="ads1"]  

बेडरूममध्ये स्टीलच्या कोठीचे कुलूप चोरट्यांनी तोडत त्यात ठेवलेले तीस हजार रुपये रोख व मेकअप बॉक्समधील सोने चांदीचे दागिने असे एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत फरजाना बी शेख यांनी देलेल्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस स्थानकात (Raver Police Station)  अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार विशाल सोनवणे आणि सहकारी करत आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!