हा रावेर ते पाल रस्ता नेहमी असाच राहील का?
रावेर तालुक्यातील पाल ,सहसलिंग ,लालमाती अतिदुर्गम असलेल्या लालमाती, कुसुंबा, मुंजलवाडी,पाल, सहसलिंर शिंदखेडा, गावाच्या रस्त्याच्या चारी दिशांना जीथे बघा तीथे खड्डेच रस्ता आहे का नाही हेच समजेनासे झाले आहे[ads id="ads2]
रस्ता बनतो लगेच जसेच्या तसे खड्डे पडतात अस का? आणी त्यातच मुंजलवाडी ते कुसुंबा पर्यंत नुतनीकरण केलेल्या रस्त्यावर चे आजुबाजूच्या कडेला साईटपट्या बनविल्या तर त्या ही चिखलातच मग कशाला प्रवाश्यांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे, लोकप्रतिनिधी / नेते / अधिकारी या कडे का लक्ष केंद्रित करत नाहीत लालमाती,सहसलिंग कुसुंबा, लोहारा, मुंजलवाडी, शिंदखेड, ह्या गावातील विकास कामे रस्ते का खड्यातच राहणार आहेत का?संबंधित विभाग का दुर्लक्ष करतय ? लोकप्रतिनिधी मुंग गिळून गप्प का आहेत ! असा संतप्त सवाल वाहन धारकांकडून होत आहे.
बहुतेक गाड्या अवजड वाहने वाहतुक रोज पाल ते लालमाती कुुसुंबा मार्गेच रावेर कडे मार्गक्रमण सुरुच आहे. वाहन चालवणा-याला तर या रस्त्यावरुन वाट शोधणे ही अवघड झाले आहे. लालमातीचा घाटाचे गेल्या २ ते ३ वर्षापुर्वी खोदकाम करण्यात आले होते तर त्या घाटाला स्वरक्षण नावेच काहीच नाही सर्व दगड रस्त्यावर पडायला लागले पाणी जाण्यासाठी नाली नाही खोदलेल्या घाटावरचे पावसाळ्यात पाणी थेट रस्त्यावरच ठेकेदारांना हे दिसले नाही का?
आताच काम लगेच खड्डे मग रस्ता बनवला तरी कसा आणि फक्त पाण्यानेच वाहुन गेला तरी कसा? रस्ता कामे नेमके होते तरी कसे रस्ता बनवला तरी कसा की तो दोन ते एकाच महिन्यात खड्यात जातो ईथे का मग फक्त हंगामी रस्ता बनवला जातो का?
रावेर तालुक्यातील लालमाती पाल हे अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण क्षेत्र आहे येथील रस्त्यांची अवस्था बघता कुठे नेवुन ठेवला आदिवासी क्षेत्राचा विकास असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो बरेच वृत्त दिले मात्र लोकप्रतिनिधी, सह संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष कायम ठाम?...
रात्री बे रात्री वाहने चालवण्यास प्रवाश्यांना अतिशय त्रास होत आहे मग आता खड्डा तर पडला मात्र लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासन करतय काय ? मिळाले निधी चे फक्त भुमीपुजनच होते तसे कामे का होत नाहीत सर्वेक्षण का केेले जात नाहीत...


