अज्ञाताने रावेर तालुक्यातील खिरोदा (Khiroda Taluka Raver) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण करीत पळवून नेले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सावदा पोलिसात (Savda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
सावदा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद
रावेर तालुक्यातील खिरोदा (Khiroda Taluka Raver) येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 23 जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अपहरण केले. [ads id="ads2"]
पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती कुठेही आढळून न आल्याने अखेर रविवारी 24 जुलै रोजी सायंकाळी सावदा पोलीस ठाण्यात (Savda Police Station) धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड (API Samadhan Gaikwad) करीत आहे.



