मनवेल ता,यावल(गोकुल कोळी) राष्ट्रीयस्तरावर आयोजित करण्यात येणारी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या परीक्षेत शारदा विद्या मंदिर या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केलेले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads2"]
यश रामदास बडगुजर, वेदांत चंद्रकांत नेवे, अनिरुद्ध मनोज नेवे, पायल जितेंद्र पवार, ज्ञानेश्वरी भरत पाटील या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले तर विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. महाजन सर यांना बेस्ट प्रिन्सिपल हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच प्रमुख अतिथिंच्या हस्ते विद्यालयास गोल्डन स्कुल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. [ads id="ads1"]
विशेष बाब म्हणजे मा. जितेंद्र गोकुळ नेवे उर्फ छोटू बाबा यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास रोख 500/- रुपये प्रोत्साहन म्हणून वैययक्तिक बक्षीस दिले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. महाजन सर यांनी केले तर अध्यक्षस्थान मा. श्री. जितेंद्र गोकुळ नेवे उर्फ छोटू बाबा यांनी भूषविले तसेच याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब श्री. वसंतराव रामजी महाजन, उपाध्यक्ष नानासाहेब श्री. सुभाष भास्कर महाजन, कार्याध्यक्ष श्री. प्रमोदभाऊ रमेश सोनवणे, संचालिका सौ. विद्याताई वसंतराव महाजन सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्री. विवेकानंद वाणी, डॉ. श्री. सुनील पाटील तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. महाजन, पर्यवेक्षक श्री. एस. जे. पवार शिक्षक प्रतिनिधी बी.ई. महाजन, वाय. बी. सपकाळे हे व्यासपीठावर उपस्थितीत होते.
डॉ. सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाचे प्रशासन, गुणवत्तेचा आलेख, यशस्वी घोडदौड याबाबत बोलतांना शारदा विद्या मंदिर हे विद्यालय ग्रामीण भागातील विद्यालयातील एक अग्रगण्य प्रतीचे विद्यालय आहे असे गौरवोदगार काढले. तसेच या विद्यालयास जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळावी अशा शुभेच्छा सुद्धा दिल्या. तसेच छोटू बाबा व डॉ. विवेकानंद वाणी यांनी सुद्धा शाळेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करत या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जी. एल. चौधरी सर यांनी केले तर आभार श्री. वाय. बी. सपकाळे सर यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू व भगिनींनी परिश्रम घेतले.



