मनवेल ता. यावल (गोकुल कोळी) : साकळी येथील शारदा विद्या प्रसारक मंडळ साकळीगट संचलित सौ. विद्याताई वसंतराव महाजन इंग्लिश मेडियम स्कूल या शाळेच्या वतीने दि.११ रोजी आषाढी एकादशीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची पालखी सहित दिंडी काढण्यात आली.[ads id="ads2"]
या दिंडीमध्ये शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी सहभागी झालेले होते.या दिंडीत विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची वेशभूषा करून टाळ मृदुंगाच्या गजरात जय जय राम कृष्ण हरी...! असा जयघोष करीत दिंडी काढण्यात आली.शाळेतील दिंडी उत्सावाने सर्व वातावरण भक्तीमय बनलेले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेचे चेअरमन तसेच माजी जि. प.सदस्या सौ.विद्याताई महाजन यांच्या हस्ते पालखीची पूजा करून करण्यात आला. सदर दिंडी महात्मा फुले चौकापासून ते गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत कढण्यात आली व दिंडीचा शाळेत समारोप करण्यात आला.[ads id="ads1"]
या दिंडी उत्सवास पालकवर्ग व ग्रामस्थांनी सुद्धा दाद दिली व सांस्कृतिक जपणूक करणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. महात्मा फुले चौकात संस्थेचे अध्यक्ष वसंतराव रामजी महाजन,उपाध्यक्ष सुभाष महाजन,सर्व संचालक मंडळ,प्रगतिशील शेतकरी जितेंद्र महाजन,नूतन विकासोचे संचालक श्याम महाजन,सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी,जयंत बोरसे यांचे सह उपस्थित ग्रामस्थ व पालक यांनी दिंडीचे स्वागत केले.
सदर उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक समाधान बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव प्रमुख वैशाली चौधरी, शिक्षक अर्जुन इंगळे, चौधरी सर,सचिव रविंद्र बोरसे,लोधी मॅडम,चौधरी मॅडम यांचे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


