गावठी कट्टे बाळगणारे चारचाकी वाहनासह पोलिसांच्या ताब्यात?यावल पोलीस अनभिज्ञ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल  ( सुरेश पाटील) गावठी कट्टे बाळगणारे आणि पोलिसांत सिनेमा स्टाईल झटापट झाल्याची घटना आज यावल शहरात दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास यावलकरांनी यावल एसटी स्टँड परिसरात अनुभवली.एवढी मोठी घटना घडली असताना मात्र यावल पोलीस अनविद्य असल्याची माहिती तसेच यावल पोलीस स्टेशनला घटनेबाबत अद्याप काहीही नोंद नसल्याचे समजले असले तरी जळगाव तालुका पोलिसांची कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

          चार चाकी वाहनात आलेले अवैध गावठी कट्टे बाळगणारे कोण? ते गावठी कट्टे कोणी कुठून आणले होते? तसेच ते गावठी कट्टे कोणाला देण्यासाठी यावल येथे आणले होते का? यावल शहरासह यावल तालुक्यात गावठी कट्टे विक्री संदर्भात काही संबंध आहेत का? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी गावठी कट्टे बाळगणारे आणि पोलिसांमध्ये यावल एसटी स्टँड परिसरात सिनेमा स्टाईल झटापट झाल्याचे सुद्धा प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

   गावठी कट्टे बाळगणारे आणि ते चार चाकी वाहन पोलिसांनी पुढील चौकशी आणि तपासासाठी नेमके कोणत्या ठिकाणी नेले याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल पोलीस स्टेशन हद्दीत घटना घडल्याने यावल पोलिसात नोंद का नाही?असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.पोलीस गावठी कट्टे संदर्भात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे तसेच यावल तालुक्यात गावठी कट्टे येत असतील तर यावल तालुक्यातील पोलीस पाटील यांच्यासह पोलिसांचे खबरे आणि यावल पोलिसांच्या गोपनीय खात्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होऊ पाहत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!