रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) निंभोरा-येथून जवळच असलेल्या वाघाडी तालुका रावेर येथील जि.प. मराठी मुलांच्या शाळेत २००९पासून दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाकार्यध्यक्ष दिपक पाटील व वाघाडी येथील सॉफ्टवेअर इंजिनियर अजय बाळू महाजन यांच्या सहकार्याने येथील पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. [ads id="ads2"]
. दप्तर,वह्या,कंपास,पेन,खोडरबर,पट्टी इत्यादी साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी ओ.बी.सी.सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, निभोरा नगरीचे माजी सरपंच डिंगबर चौधरी,राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस वाय.डी.पाटील,माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद रझोदकर,सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष जगदिश कोचुरे, [ads id="ads1"] राष्ट्रवादी निंभोरा शहर अध्यक्ष अतुल पाटील,युवक शहराध्यक्ष नवाज पिंजारी,वाघाडी उपसरपंच राजेंद्र महाजन, सीताराम महाजन, भागवत चौधरी, शालीक महाजन, माजी उपसरपंच बाळू कोळी,पंढरीनाथ दोडके,मधुकर चौधरी, मधूकर पाटील, वासुदेव चौधरी,महेंद्र पाटील,मनोहर तायडे, बबलू महाजन,गणेश महाजन, महाजन, अजय महाजन,जयदीप चोपडे,शांताराम कोळी यांसह ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.