मनवेल ता.यावल (गोकुल कोळी) : येथुन जवळ असलेल्या थोरगव्हाण येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे गटारी गटारी तुंबल्या आहे तर सांडपाणी वाहुन जाण्यासाठी जागा नसल्यामुळे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.[ads id="ads2"]
गेल्या तीन - चार महिन्यां पासून गावातील विविध भागातील गटारी काढण्यात आल्या नसल्यामुळे तुंबल्या आहे.नियमित गटारी साफसफाई केल्या जात नसल्याने डांसाच्या उपद्रव वाढला आहे.येथील गटारी काढण्यात याव्या अशी मागणी होत आहे.[ads id="ads1"]
ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे गटारी काढण्यात येत नसल्यामुळे ग्रामस्थकडुन त्रीव संताप व्यक्त होत आहे.ग्रामसेविका वेळेवर येत नाही.अनियमीत येत असल्यामुळे गावात विविध समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.पिण्याच्या टाकीत टी.एस सहा महिन्यां पासून आणलेली नाही,पथदिवे बंद आहे,शिपाई च्या पगार दोन पगार अनामत टाकून दिला जात आहे. गावातील गटारी पावसाळ्या पुर्वी सफाई करणे गरजेचे आहे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आहे,
येथील पाण्याची टाकी जवळ , ग्रामपंचायत जवळची गटार सह स्मंशानभुमीकडे जाणाऱ्या गटारी फुल्ल भरल्याने पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाले असल्यामुळे पायी चालणे मुश्कील झाले आहे.
सरपंच व ग्रामसेविका मँडम यांचा मनमानी गावातील विविध भागातील गटारी तुंबल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे गटविकास अधिकारी सह आरोग्य प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी थोरगव्हाण ग्रामपंचायत सदस्यं गोपाल पाटील, अशोक भालेराव, पदमाबाई पाटील , हिरालाल चौधरी, यशोदाबाई भालेराव ,मनोहर पाटील यांनी केली आहे.
----------------------
गावातील सर्व गटारी काढण्यासाठी एका व्यक्तीला पंधरा हजार रुपयात काम दिले आहे त्याने अद्यापही सुरु केले नाही मी सोमवारी आँफीलला गेल्यावर विचारणा करते त्या व्यक्तीला काम परवड नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडुन गटारी काढण्यात येतील.
कविता बावीस्कर
ग्रामसेविका ग्रा.प.थोरगव्हाण