ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर च्या वतीने संपादित "आझादी का अमृत महोत्सव: भारत के जन- जन का, भारत के हर मन का पर्व" या ग्रंथाचे मा.कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या शुभहस्ते ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन मनोगतावेळी मा.कुलगुरूनी पुस्तक प्रकाशन उपक्रमाचे कौतुक केले.[ads id="ads2"]
तसेच स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप मोठा संघर्ष केला.त्या संघर्षाची माहिती आजच्या युवापिढीला व्हावी त्यापासुन त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी असे उपक्रम राबविणे महत्वाचे असे मत मांडले.विद्यापिठामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राबवित असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री रामदास महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात ग्रंथ संपादक मंडळाचे व शोधनिंबध लेखकांचे कौतुक केले.स्वांतत्र्यासाठी लढणाऱ्या महापुरूषांची माहिती आजच्या पिढीला कळावी यासाठी असे ग्रंथ निर्माण होणे गरजेजे आहे असे मत मांडले.[ads id="ads1"]
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी केले प्रास्ताविकातून त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यासाठी लढणार्या विरांची वीरकथा आजच्या पिढीला कळावी त्यापासुन त्यांनी प्रेरणा घ्यावी.या हेतूने प्रेरित होऊन सदर ग्रंथ संपादित केल्याचे मत त्यांनी मांडले.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. प्र- कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे (क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव.) मा. भागवत भाऊ पाटील ,मा. श्रीराम ना. पाटील ,मा. संजय वा. पाटील, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य मा. दिपक बं. पाटील ,मा. प्रा. सुनील कुलकर्णी व सर्व संचालक मंडळ ऐनपूर. तसेच संपादक मंडळ प्रा.डॉ.संदीप सांळुके,प्रा.अक्षय महाजन व प्रा.प्रदिप तायडे, शोधनिबंध लेखक,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.के.जी.कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अक्षय महाजन यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.