🌠अधीर प्रेम🌠
करतोय प्रतिक्षा तुझी
त्या चार शब्दांची !!
प्रेम झालेय मनोमनी
प्रेमाच्या या चार शब्दांनी !!
नाही उरला पोटात घास
तुझ्या प्रेमाचा इशारा खास
रुजलय मन तुझ्यात आज...
बहरलाय फुलांचा साज
सुगंध दरवळतोय मनाचा आज !!
राहीला तोच विश्वास
चार शब्दाचा हा प्रवास
चार शब्दांचा हा प्रवास !!..
✍️ वैभव काटकर