भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्वची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  यशवंत भवन, वाघ नगर, जळगाव येथे आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्वची जिल्हास्तरीय वार्षिक बैठक उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागीय सचिव आणि जळगाव जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख के. वाय. सुरवाडे होते. [ads id="ads2"] 

  बैठकीमध्ये जळगाव पूर्व मधील आठ पैकी पाच तालुक्यांच्या अध्यक्षांनी आपापल्या तालुक्यांचा कार्य अहवाल सादर केला. त्यात जळगाव तालुका अध्यक्ष जगदीश सपकाळे, भुसावळ तालुका सरचिटणीस प्रवीण डांगे, रावेर तालुका अध्यक्ष अनोमदर्शी तायडे, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष शरद बोदडे, जामनेर तालुका अध्यक्ष वसंत लोखंडे इत्यादी तालुकाध्यक्षांनी आपापल्या तालुक्यांचा अहवाल सादर केला. [ads id="ads1"] 

  या बैठकीमध्ये येत्या 13 जुलैपासून सुरू होणाऱ्या वर्षावासासंबंधी नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे धम्म पर्यटन काढणे, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेणे, सभासद नोंदणी अभियान राबविणे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीमध्ये जिल्हा शाखा जळगाव पूर्वचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात सुभाष सपकाळे, आनंद ढिवरे, विजय अवसरमल, सुशीलकुमार हिवाळे, ए.टी. सुरडकर इत्यादी उपस्थित होते. तालुक्यातील पदाधिकारी यशवंत जाधव, सदाशिव निकम ही उपस्थित होते. त्याचबरोबर समता सैनिक दलाचे मेजर रमेश सावळे हेही उपस्थित होते. 

  केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार, माधुरी भालेराव इत्यादी उपस्थित होत्या. जिल्ह्यातील श्रामनेर माजी श्रामनेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक इत्यादी ही उपस्थित होते. त्याचबरोबर संघरत्न दामोदरे, प्रा. डॉ. संजीव साळवे, विश्वनाथ मोरे, प्रकाश सरदार, नंदा बोदोडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्ह्याचे सरचिटणीस सुमंगल तथा रवींद्र अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्ह्याचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप रवींद्र वानखेडे यांनी केला. जिल्ह्याच्या बैठकीमध्ये उपासक उपासिका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!