रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर तालुक्यातील पुनखेडा पुल हा विदर्भ, मुक्ताईनगर कडे जाणारा प्रमुख मार्ग, सातपुड्यातील भोकर नदीवर जिर्ण झालेला अरुंद यावरून सतत वर्दळ चालायची. आता नविन पुल गेल्या एक वर्षापासून अतिशय धिम्या गतीने पुलाचे काम ठेकेदारा मार्फत सुरु आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने भोकर नदी वाहत आहे. त्यामुळे या मार्गाची वाहतुक बंद असल्याने शाळकरी मुला मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.[ads id="ads2"]
या बाबत प्रहार जनशक्ती किसान आघाडीच्या वतीने स्वखर्चाने पर्यायी रस्ता बनविला जात आहे त्यामुळे तुर्त तरी लहान वाहने या रस्त्याने ये-जा करणार असल्यामुळे विद्यार्थांना यामुळे दिलासा मिळणार आहे. सदर पुलाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत आहे पुलाचा एक भाग वन साईड झालेला दिसुन येत आहे, तरी संबधित ठेकेदार व अधिकारी याकडे कोणी ही लक्ष देत नसल्याने प्रहार जनशक्ती किसान आघाडीने पुढाकार घेवुन आवाज उठविला आहे. व स्वखर्चाने जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पर्यायी रस्ता बनविला त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.