वंचित बहुजन आघाडी या पक्षाची रावेर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (प्रतिनिधी) दि.31 रावेर वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 31/7/2022 रविवार रोजी दुपारी 12. वाजता सावदा रोडवरील नवीन रेस्ट हाऊस येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विनोद भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्याचे महासचिव दिनेश भाऊ ईखारे यांनी मार्गदर्शन करताना येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद या निवडणुका होऊ घातलेल्या असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त उभे करून रावेर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे खाते उघडायचे आहे[ads id="ads1"] .

असे ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, रावेर व सावदा नगरपरिषद यांचा आढावा दिला. तसेच पंचायत समिती चे एकूण 14 गण असून जिल्हा परिषद 7 गट आहे. याची संपूर्ण माहिती दिली.

जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे हे अध्यक्ष भाषणात म्हणाले की जिल्हा परिषद 7 गटामध्ये पक्षाने जे निरीक्षक नेमले आहे त्या सर्वांनी आतापासून त्यांच्या गटामध्ये बैठका लावून वातावरण निर्मिती तयार करून उमेदवार यांना मार्गदर्शन करावे. व वेळोवेळी तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव यांच्या संपर्कात राहून पक्षाने दिलेल्या नियमांचे व अटींचे पालन करावे. श्रद्धेय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांनी काढलेला आदेश हा सर्व कार्यकर्त्यांसाठी समान असेल जे कार्यकर्ते पदावर असून पक्षाचे काम करणार नाही त्यांना पदमुक्त केले जाईल. असे ते जिल्हाध्यक्ष भाषणात म्हणाले.[ads id="ads2"] 

यावेळी वंचित बहुजन आघाडी मध्ये अरविंद गाढे रेंभोटा, विजय भालेराव ऐनपुर, गोपाळ भालेराव ऐनपुर, मोहसीन नासिर शहा सावदा, या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांनी केला. तसेच नवीन महिला आघाडी अध्यक्ष गायत्री मोहन कोचुरे, आशा नेहते, रत्ना सोनवणे, माधुरी भालेराव, पुनम कोचुरे, आस्मा पिंजार, संत्रा बाईला बारेला, सयानी बाई बारेला या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला शे. याकूब शे. नसीर, रफिक बेग, लोकेश निंभोरे, सुरेश अटकाळे, राजेंद्र अवसरमल अर्जुन वाघ, कंदर सिंग बारेला, राहुल गाढे, उमेश सवर्णे, सागर इंगळे, नितीन अवसरमल, सलीम शहा सुमेध सवर्णे, नितीन अशोक अवसरमल, विजय भालेराव, गोपाल भालेराव, तरुण गाढे, कालू बारेला. इत्यादी पदाधिकारी, महिला पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!